baba siddique 4 accused arrested 
ताज्या बातम्या

Baba Siddique हत्याप्रकरणातील चौथा आरोपी पकडला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. चौथ्या आरोपीला किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. या आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पो

बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणातील चौथ्या आरोपीला किल्ला कोर्टात हजार करण्यात आले आहे. हरिश कुमार कश्यप असं या आरोपीचे नाव आहे. या आरोपीच्या खात्यावरून पैसे ट्रान्स्फर झालेले पोलिसांच्या तपासत आले आहे. या आरोपीचा पुण्यात स्क्रॅपचा धंदा आहे. या प्रकरणातील आरोपी शिवकुमार गौतम याच्याशी हरिशचे कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. हे दोघे एकाच गावचे आहेत. बहराईच गावतील हे दोन्ही आरोपी आहेत. हा भंगारवाला असून याच्या खात्यावर मोठी रक्कम कुठून ट्रान्सफर झाली याचा तपास पोलीस घेत आहेत. यामध्ये या आरोपीचे दुसऱ्या आरोपेशी कनेक्शन असल्यामुळे पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. या आरोपीला 21 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा