2025 मध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरात मोठ-मोठ्या नैसर्गिक आपत्ती तसेच अपघात झालेले पाहायला तसेच ऐकायला मिळाल्या आहेत. ज्यात अहमदाबादमधील विमान अपघात, उत्तराखंड धरालीतील आणि काश्मीरच्या किश्तवार येथील ढगफुटी हे लक्षवेधी अपघात ठरले. यादरम्यान आतापर्यंत झालेल्या घटनेत मोठ्याप्रमाणात जीवितहानी देखील झाल्याचं समोर आल आहे.
यासंदर्भात अनेकदा यासर्व घटनांचा संबंध बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीशी जोडला जात असल्याचं देखील ऐकायला मिळालं आहे. गेले काही दिवस राज्यासह देशभरात पावसाचा मुसळधार जोर पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बाबा वेंगा यांनी असं भाकित केलं आहे की, 2025 मध्ये संघर्ष, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींनी जगाचा अंत सुरू होईल.
2025 मध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्याप्रमाणात विनाश आणि जीवितहानी होऊन अनेक देशांचे नुकसान होईल. यामध्ये महापूर, आग, ढगफुटी, ज्वालामुखीचा उद्रेक, हवामान बदल, हिमनद्या वितळणे, जंगलातील आगीमुळे जगाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे आता हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे की बाबा वेंगा यांनी केलेली ही भविष्यवाणी खरचं जगाच्या विनाशकारी अंताचा एक संकेत आहे का?
बाबा वेंगा यांना 'बल्गेरियन पैगंबर' म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन होण्यापुर्वी त्यांनी 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.