वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत एक मोठा दावा केला आह. संघाच्या शस्त्रपूजनात AK-47 आणि हँड ग्रेनेड असतात, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांना एक आव्हानही दिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीही संघाच्या कार्यालयात गेले नव्हते, जर नवनाथ बन यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय आहे.