थोडक्यात
मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं
इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री
या फेरबदलांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार त्यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे. तर दुसरीकडे इंद्रनील नाईक आता गोंदीयाचे नवे पालकमंत्री असणार आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात अशी टीका केली होती, त्यानंतर आता या फेरबदलांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल पटेल यांनी काही दिवसापूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात बोलताना पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात अशी टीका केली होती. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार असल्याची माहिती दिली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे.