प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 7 दिवस गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर सरकारने आश्वासन दिल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केलं होतं. मात्र यामध्ये नतंर कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. सरकार काही सांगायला तयार नाही, त्यामुळे सरकारने आम्हाला बनवाबनवी करू नये, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
सक्तीची कर्ज वसुली थांबवा व कर्जमाफीकरता बच्चू कडू यांनी एल्गार पुकारत 5 जुलैपासून स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पापळ गावापासून ते चिखलगव्हान अशी 138 किलोमीटर बच्चू कडू काढणार पायदळ यात्रा तसेच 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट रामटेके ते दीक्षा भूमी, नागपूर अशी सिंदूर यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही लहान गोष्ट नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
हेही वाचा