ताज्या बातम्या

Bacchu kadu : शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक; 'बारामती ते नागपूर', सांगितला आंदोलनाचा मार्ग

कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'डीसीएम टू सीएम'पर्यंतच्या आंदोलनाचा निर्णय त्यांनी घेतला.

Published by : Rashmi Mane

कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'डीसीएम टू सीएम'पर्यंतच्या आंदोलनाचा निर्णय त्यांनी घेतला. हे आंदोलन पुढील महिन्यात करण्यात येईल. हे 'अर्थसंकल्प वाचन आंदोलन' 2 जून रोजी बारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर सुरू होणार असून ६ जून रोजी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य घरासमोर याचा शेवट होणार आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

दरम्यान, अजित पवारांनी कर्जमाफीचे आश्वासन आपण दिले नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचा राजकीय बाप असलेल्या भाजपचं कर्जमाफीचं वचन पूर्ण करणं ही अजित पवारांची जबाबदारी असल्याचं कडू म्हणाले. शेवटी बापानं दिलेलं वचन मुलालाच पूर्ण करावं लागतं, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा