ताज्या बातम्या

Badlapur : बदलापूरमधील शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार, पालकांसह बदलापूरकरांचं ठिय्या आंदोलन

बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे. तर लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेसह वर्गशिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. पालकांसह नागरिकांचही शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु असून, पालक तसेच नागरिक आक्रमक झालेले पाहून शाळेच्या गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे.

या घटनेमुळे बदलापूरमध्ये पालक आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन करताना दिसून येत आहेत, त्यामुळे रेल्वे रुळावरील आंदोलनामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. आंदोलनादम्यान पोलिसांकडून देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या घटनेमुळे पालक तसेच नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

या घटनेदरम्यान वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असून तसेच आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला आहे. शाळेनं सर्व पालकांचीही जाहीर माफी मागितली आहे. मात्र या घटनेमुळे पालक तसेच नागरिकांमध्ये आक्रमकता पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar- आजचा सुविचार