Prasad Lad Team Lokshahi
ताज्या बातम्या

BJP MLA Prasad Lad : प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली पैशांनी भरलेली बॅग

या घटनेचा तपास सुरु केला असून ही बॅग नेमकी कोणी ठेवली याचा शोध घेतला जात आहे. हा चोरीचा मुद्देमाला असावा असा प्राथमिक संशय असून पोलीस तपास करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad ) यांच्या माटुंग्यामधील घराबाहेर पैशांनी भरलेली बॅग सापडल्याची माहिती मिळाली आहे. या बॅगमध्ये पैशांसोबत सोने आणि चांदीच्या मूर्तीदेखील आहेत. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेचा तपास सुरु केला असून ही बॅग नेमकी कोणी ठेवली याचा शोध घेतला जात आहे. हा चोरीचा मुद्देमाला असावा असा प्राथमिक संशय असून पोलीस तपास करत आहेत.

प्रकरण काय?

अज्ञात व्यक्तीने ठेवलली ही बॅग सुरक्षारक्षकाला आढळली. ही बॅग सापडल्यानंतर काही वेळासाठी भीती पसरली होती. यानंतर त्याने प्रसाद लाड यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. पोलीस सध्या तपास करत असून सीसीटीव्हीदेखील तपासलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता बॅगेत पैशांची नाणी तसंच सोने, चांदीच्या मूर्ती सापडल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा