वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज वकिलाने बिनशर्त मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याआधी खंडणी प्रकरणातील न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर वकिलाने केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज केला होता.
या अर्जावरील सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आज वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी केज न्यायालयामध्ये जामीन अर्ज बिनशर्त मागे घेण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती मिळत आहे.