ताज्या बातम्या

Avinash Bhosale : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाने बुथवारी आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातही जामीन मंजूर केला असल्याची माहिती मिळत आहे. अविनाश भोसले यांच्यावर ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचे पुराव्यांतून दिसून येत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

ईडीने 28 जून 2022 रोजी अविनाश भोसले यांना अटक केली होती. भोसले यांना सीबीआय ने 26 मे 2022रोजी अटक केली होती, त्यानंतर, याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने अविनाश भोसले यांना अटक केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आता अविनाश भोसलेंना जामीन मंजूर झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य