ताज्या बातम्या

Bajrang Sonwane On Walmik Karad: वाल्मिक कराडचे CIDसमोर आत्मसमर्पण; बजरंग सोनवणे यांची पहिली प्रतिक्रिया

वाल्मिक कराडचे आत्मसमर्पण; बजरंग सोनवणे यांच्या प्रतिक्रिया

Published by : Prachi Nate

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणा प्रकरणी आणि हत्ये प्रकरणी बीडसह संपुर्ण राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती तसेच बीड देखील हादरले होते. याचपार्श्वभूमीवर यासर्व घटनेचचा मोर्क्या वाल्मिक कराड याने आज पुणे CIDसमोर आत्मसमर्पण केले आहे. दरम्यान बजरंग सोनवणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

याचपार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे म्हणाले-

माझी पोलिसांना विनंती आहे त्यांना ज्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलं आहे त्यासंबंधीत सर्व चौकशी झालीच पाहिजे आणि त्यानुसार योग्य ती कारवाई देखील झाली पाहिजे. वाल्मिक कराड यांनी CIDसमोर आत्मसमर्पण करण्यापुर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते म्हणाले आहेत माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही.

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी कराडांनी केलेल्या या वक्तव्यावर बजरंग सोनवणे म्हणाले की, त्यांनी मागणी काय कराव हा त्यांचा अधिकार आहे... शरण आले तर मग ते आधी पळाले का होते? CID यंत्रणेने तपास करावा तीन गुन्हे क्लब केल्याने काही तरी निश्चित आहे... दूध का दूध पाणी का पाणी होईल न्याय मिळून देणे ही आमची जबाबदारी आहे जो पर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत अभिनंदन करणार नाही...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश