बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. बजरंग सोनवणे म्हणाले की, मस्साजोगमध्ये सरपंच यांची जी हत्या झाली. त्या प्रकरणाशी संबंधित जे विषय आहेत. याची सुरुवात कधी झाली तर मे महिन्यामध्ये झाली. मे महिन्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर विषय थांबला गेल्या. 28 नोव्हेंबरला परत खंडणी मागण्याच्यासंदर्भात कुणीतरी कुणालातरी बोलवले, अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आली.
28 नोव्हेंबरच्यानंतर 29 नोव्हेंबरला अधिकारी गेलेत त्यांना खंडणीची मागणी केली गेली. असा प्रकार घडला. त्यांना सांगितले की, तुम्ही काम बंद करा, नाहीतर आम्हाला येऊन भेटा. अशी कळालेली माहिती आहे. त्या कंपनीने पवनचक्कीचे काम आहे ते केज तालुक्यात बंद केले नाही. मस्साजोगला त्याचाच एक विषय डोक्यात धरुन ज्या दिवशी अधिकारी येतील त्यादिवशी त्यांच्यावर हल्ला करायचा भूमिका घेतलेली असावी. म्हणूनच की काय 6 डिसेंबरला तो दिवस आपल्यासाठी खूप वेगळा दिवस आहे. त्याच दिवशी जे आरोपी आहेत या आरोपींनी मस्साजोगच्या जे त्यांचे ऑफीस आहे तिथे जाऊन त्या अधिकाऱ्यावर हल्ला करायचा काम केलं. तिथे जे वॉचमन आहेत त्या वॉचमनलाही मारलं. ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुख हे सरपंच आहेत त्या गावचे. त्यांना ती घटना सिक्युरिटी गार्डने फोन करुन सांगितली. त्यानंतर सरपंच तिथे गेले असता त्यांना पण तुम्ही इथं का आलात म्हणत मारहाण झाली आणि त्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले. तेव्हा थोडाफार वाद झाला होता त्यात मध्यस्थी झाली त्यानंतर हे लोक तिथून निघून गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली. पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास 3-4 तास त्यांना बसवलं. तरी फिर्याद त्यांची घेतली नाही. आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस विभागाने तशी फिर्याद न घेता काहीतरी थातुरमातुर गुन्हा दाखल केला.
7 - 8 तारखेला शनिवार, रविवार आला त्यानंतर वरील आरोपींना त्या गुन्हामध्ये 9 तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली. आता हे असं बीड जिल्ह्यामध्ये का घडत होते याचा शोध घेणं महत्वाचे आहे. पोलीस स्टेशनला त्यांची जातीवाचक शिवीगाळ केलेल्याचा गुन्हा घेऊ नका, साधाच गुन्हा दाखल करा, म्हणून कोणाचा फोन आला. हे तपासणे गरजेचे आहे. ही माझी मागणी आहे. त्यादिवशी 6 तारखेलाच कोणी फोन केला? कशावर पोलिसांनी साधी फिर्याद घेतील. याच्यामध्ये पीएसआय जे निलंबित झाले आहेत ते या प्रकरणामध्ये सहभागी होते का? याचा पूर्ण तपास करायचा आहे. यासर्व गोष्टी करताना सोमवारी 9 डिसेंबरला ज्यादिवशी या आरोपींना जामीन मिळाली त्या आरोपीबरोबर पीएसआय आपल्याला दिसत आहेत. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. सरपंचाचा भाऊ पण त्या हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलवून घेऊन बोललेले व्हिडिओ पण व्हायरल झाले. याच्यामध्ये कोणीतरी म्हणतोय हा व्यवहारिक विषय आहे. मान्य आहे की, व्यवहारिक विषय आहे पण सरपंचाचा व्यवहारिक विषय नाही आहे. व्यवहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावे.
पोलीस विभागाचे मला एक कळत नाही त्यांनी 9 तारखेला ही घटना घडल्यानंतर त्याचा राग मनात धरुन जी 6 तारखेची घटना घडली. 9 तारखेला यांना जामीन झाली. सरपंच त्यावेळेस लातूरला गेले होते. लातूरहून आल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. त्यांच्या मागेपुढे गाड्या ठेऊन त्यांना अडवून संतोषला गाडीतून मारत बाहेर काढलं. 3 वाजून 25 मिनिटाला घटना समजा साडेतीनच्या दरम्यान घडली आणि त्यांना उचलून नेलं गेले. टोल नाक्याहून पूर्व दिशेला आणल्यानंतर परत टाकळी फाट्यावरुन नेले गेले असं म्हटले जात आहे पोलिसांकडून. मला साडेचार वाजता माझा पीए फोन करत होता अशी अशी घटना घडली, सरपंचाला किडनॅप केलं. त्यानंतर मला साडे सहाला माझ्या पीएनं सांगितले की, कीडनॅपिंग नाही तर हत्या झाली. मला घाम आला की, मी ज्या जिल्हापरिषद गटामधून जिल्हापरिषद सदस्य झालो त्यामध्ये ते गाव आहे मस्साजोग. या मस्साजोग गावचे ते सरपंच. हा मुलगा कुठलंही राजकारण करणारा नाही. जातीय दंगलीत नाहीत. हा मुलगा एवढा सुंदर होता. या मुलाला पळवून नेले गेले. कीडनॅपिंग केले गेले आणि कीडनॅपिंग करुन घेऊन त्याला टॉर्चर करुन मारलं. जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये 56 जे व्रण आहेत त्या 56 व्रणावर एकावर एक किती झाले असतील. असा काय गुन्हा त्याने केला होता. त्याने फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमनला मदत केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला. हाच त्याचा गुन्हा होता का? त्याच्यामुळे एवढे मारलं गेले. या गोष्टीचा तपास करणे सर्वांत महत्वाचे आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 6 तारखेला कुणाचा फोन आला? 9 तारखेला ही घटना घडल्यानंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोलले? पोलीस स्टेशनला कोण बोलले? इथे बनसोड नावाचे पीआय आहेत त्यांना कोणाचा फोन आला? बनसोडचासुद्धा सीडीआर काढा. खरा तपास करायचा आहे ना, सर्वांचा सीडीआर काढा. या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील. फक्त एसपीची बदली झाली. मी कौतुक करणार आहे, आभार मानणार आहे. नवीन एसपी आता जॉइन झाले आहेत. मी त्यांच्याबरोबर पण बोलणार आहे. मला सांगायचे आहे, यांचे सीडीआर काढले तर बऱ्यापैकी गुन्हेगार सापडणार. त्यांनी सांगितले आम्ही दोन आरोपींना अटक केले. तिसरा आरोपी आम्ही उचलून आणला. चौथासुद्धा ते म्हणतात आम्ही अरेस्ट केलं आहे. पण काल सत्ताधारी पक्षाचे एक आमदार बोललेत की, ते सरेंडर झालेत आणि पोलीस यंत्रणा म्हणतेय आम्ही अरेस्ट केलेय. याच्यामध्ये तफावत का येत आहे. मग खरे काय? अटक झाली की सरेंडर झालेत. सरेंडर झालेला आरोपी जो आहे तो दोन्ही गुन्हात आहे. सर्वांची एकच मागणी आहे मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. मास्टरमाईंडसहित शिक्षा झाली पाहिजे. पाचव्या आरोपीला कधी अटक होणार आहे. तीन आरोपी फरार आहेत. 15 दिवस झाले तरी 3 आरोपींना अटक होत नाही. यावर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिले की, कोणीही आरोपी आम्ही सोडणार नाही. शुक्रवारी त्यांनी निवेदन केलेले आहे 6 दिवस झाले पुढे प्रगती काही झालेली नाही. फक्त एसपीची बदली होऊन दुसरे एसपी जॉईन झालेले आहेत. पालकमंत्री कोण करायचे हे तीन पक्षांचा विषय आहे. पण त्या प्रकरणाच्या खोलात जायचे आहे तर शिवसेनेचे काल दोन मंत्री येऊन गेले, भाजपचे एक मंत्री येऊन गेले, अजितदादा येऊन गेले. माझी तर इच्छा आहे खरंच तपास करायचा आहे तर अजितदादांनीच पालकमंत्री होऊन तपास करावा. अजितदादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घ्यावे. जे जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर काढा. कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात राहिलेली नाही. कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करा. माझी हात जोडून विनंती प्रशासनाला, मंत्री महोदयाला, मुख्यमंत्र्यांना की, तुम्ही लवकरात लवकर आमच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या. असे बजरंग सोनवणे म्हणाले.