बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बीकेसी मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीकेसी मैदानावर जय्यत तयारी पाहायला मिळतेय. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार देखील केला जाणार आहे
यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अंधेरीत मेळावा होणार आहे. या महामेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारी छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आता या दोन्ही मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आणि नव्या वर्षातील पहिलीच जाहीर सभा असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.