Admin
Admin
ताज्या बातम्या

आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही - बाळासाहेब थोरात

Published by : Siddhi Naringrekar

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. ज्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलं आहे. त्यांचा पुतळा ज्या परिसरात आहे, त्याच परिसरात हे जोडे मारण्याचे काम केले असे अजित पवार म्हणाले.

तसेच राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा . अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. अशी घटना कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत घडता कामा नये हे सांगितले. असं जर कोणी केलं तर त्यांना निलंबीत केलं पाहिजे. असे अजित पवार म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते आपल्या विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आज आमचे राष्ट्रीय नेते आहेत, उद्या त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत. आज आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक अशी कारवाई करावी. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?