ताज्या बातम्या

'पालकमंत्री आहात मालकासारखे वागू नका...'; विखे पाटलांवर थोरांतांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे.

Published by : shweta walge

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. आता बाळासाहेब थोरात यांनी 'पालकमंत्री 'पालकमंत्री आहात मालकासारखे वागू नका,' अशा शब्दात विखेंवर खोचक टीका केली आहे.

संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला प्रांत-तहसीलदार उपस्थित नव्हते. हे अधिकारी पालकमंत्री विखेंनी बोलावलेल्या बैठकीला गेल्यामुळे या वेळी अनुपस्थित होते. त्यामुळे थोरातांनी आपणही महसूलमंत्री राहिलो आहोत, पण असे वागलो नाही, असे म्हणत विखेंवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरच उत्तर देत संगमनेरमध्ये सुरू असलेल्या वाढत्या पाणीटंचाईमुळे सुरू करावे लागलेल्या टँकरची आकडेवारी मांडून, तसेच अवैध वाळूउपसा आदी उदाहरणे देत थोरात महसूलमंत्री असताना केलेल्या कामाचे वाभाडे काढले.

संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा हल्ला केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत