ताज्या बातम्या

हायजॅकच्या इतिहासातील 5 मोठ्या घटना: जाणून घ्या काय घडले

ट्रेनच्या या अपहरणाच्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

Published by : Team Lokshahi

जाफर एक्सप्रेसमध्ये ओलिस ठेवले आहे. इतकेच नाही तर यामध्ये अनेक सुरक्षारक्षकांना ठारदेखील करण्यात आले आहे. दरम्यान ही ट्रेन जेव्हा हायजॅक केली तेव्हा 400 प्रवासी यामध्ये प्रवास करत होते. ट्रेनच्या या अपहरणाच्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र याआधी जगभरात हायजॅकच्या 5 मोठ्या घटना झाल्या आहेत. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.

वर्ल्ड ट्रेड सेंटर :

अमेरिकेमध्ये 9 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरुन सोडले होते. सप्टेंबर 2001 साली अमेरिकेची दोन प्रवासी विमाने दहशतवाद्यांनी ताब्यात घेतली. ही विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डिसीमधील पेंटागॉननवर धडकवली गेली. या हल्ल्यामध्ये सुमारे 3 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन होता.

एअर इंडिया फ्लाइट 182 कनिष्क :

एअर इंडियाचे विमान 182 कनिष्कचे हायजॅकदेखील मोठी घटना मानली जाते. अटलांटिक महासागरावर उडत असताना या विमानाचे अपहरण केले होते. या विमानामध्ये दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवला होता आणि स्फोट घडवून आणला होता. या घटणेमध्ये 329 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ल्यामागे कॅनडामधील बब्बर खालसाच्या उग्रवाद्यांचा हात होता.

कंदाहर हायजॅक :

24 डिसेंबर 1999 साली इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-814 या विमानाचे अपहरण केले गेले होते. अपहरण केलेले विमान पाकिस्तान, कंदाहर येथे घेऊन जाण्यात आले. अपहरणकर्त्यांनी आतंकवादी मौलाना मसुदला सोडण्याची मागणी ठेवली होती.

TWA फ्लाइट 847 :

1985 साली एथेन्समधून रोमला जाणाऱ्या ट्रान्स वर्ल्ड एअरचे विमान 847 चे अपहरण केले गेले. हिजबुल्लच्या आतंकवाद्यांनी या विमानाचे अपहरण केले होते. 17 दिवस या विमानाचे अपहरण केले होते. या विमानामध्ये 139 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते.

फ्लाइट 961 अपहरण :

1996 साली इथिओपियाई लोकांनी इथियोपिया एयरलाइंसची फ्लाइट 961 अपहरण केले होते. या विमानाच्या अपहरणकर्त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये राजनैतिक आश्रय हवा होता. मात्र विमानामध्ये इंधन कमी असल्याने कॅप्टनने विमानाला कोमोरोस द्वीपकडे वळवले. मात्र त्याठीकाणपर्यंत ते पोहोचू शकले नाही आणि पाण्यामध्येच विमान क्रॅश झाले. या घटणेमध्ये 172 मधील 122 प्रवाशांचा मृत्यू झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू