ताज्या बातम्या

Ullu, ALTBalajiसह 25 OTT अ‍ॅप्सवर बंदी ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अश्लील कंटेंटवर बंदी: केंद्र सरकारचा कठोर निर्णय

Published by : Shamal Sawant

देशातील नागरिकांचा प्रचंड विरोध आणि तक्रारींची दखल घेत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अश्लील आणि अनैतिक कंटेंट प्रसारित करणाऱ्या 25 OTT अ‍ॅप्सवर सरकारने थेट बंदी घातली आहे. यामध्ये उल्लू, ALTBalaji (ALTT), देसीफ्लिक्स, बिग शॉट्स, रॅबिट मुव्हीज, व्हूव्ही, प्राईम प्ले यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. या बंदीमुळे नागरिकांना आता खुलेआम अश्लीलता प्रसारित करणाऱ्या अ‍ॅप्सपासून संरक्षण मिळणार असून, अल्पवयीन मुलांचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक नैतिकतेचे रक्षण होणार आहे.

काय आहे सरकारचा निर्णय?

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) या OTT अ‍ॅप्सवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या अ‍ॅप्सवर अश्लील आणि लैंगिक स्वरूपाच्या वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स व कंटेंटचा खुलेआम प्रसार केला जात होता. या गोष्टींमुळे सार्वजनिक नैतिकता, युवा वर्गाचा मेंटल हेल्थ आणि अल्पवयीन मुलांवर वाईट परिणाम होतो, अशी नागरिकांची तक्रार होती.

कायद्यानुसार कारवाई

या OTT अ‍ॅप्सने IT नियम 2021, IPC कलम 292 आणि 293 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67A चे उल्लंघन केले. तसेच बाल लैंगिक शोषणाशी संबंधित बाबींवर POCSO कायद्यानुसारही कारवाई शक्य होती. सरकारने यापूर्वी OTT प्लॅटफॉर्म्सना स्वनियमनाचा अधिकार दिला होता, मात्र काही प्लॅटफॉर्म्सनी या अधिकाराचा दुरुपयोग करून गंभीर प्रकारची अश्लीलता प्रसारित केली. त्यामुळे सरकारने थेट हस्तक्षेप करत ही बंदी लागू केली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या OTT अ‍ॅप्सची यादी

Ullu, ALTT (ALTBalaji), Desiflix, Big Shots, Boomex, MoodX, NeonX VIP, Mojflix, Triflicks, Hulchul App, HotX VIP, Uncut Adda, Besharams, Xtramood, Chikooflix, Fugi, Nuefliks, Prime Play, Hunters, Rabbit Movies, Voovi, X Prime,Yessma, Dreams Films, Hot Shots VIP

फक्त OTT नव्हे, जुगार अ‍ॅप्सवरही बंदी

2022 ते जून 2025 दरम्यान केंद्र सरकारने एकूण 1,524 अवैध सट्टेबाजी आणि जुगार अ‍ॅप्स/वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्सवर परदेशी प्लॅटफॉर्म्सद्वारे भारतात ऑनलाइन जुगार, सट्टा आणि गेमिंग सुरू होते. या अ‍ॅप्सनी भारतीय कायदे आणि कर प्रणालीचा उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : गेल्या 72 तासांत इस्त्रायलचे 6 देशांवर हल्ले

Solapur Crime: माजी उपसरपंचाचा आत्महत्येचा धक्कादायक प्रकार; नर्तिकेशी प्रेमसंबंधामुळे घेतले टोकाचे पाऊल

Jalgaon Crime : लग्नाला अवघे चार महिने; सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, जळगावात हळहळ

Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र बनवायचे? काय आहे प्रक्रिया जाणून घ्या....