Lokshahi Reality Check : कफ सिरपवर बंदी, खबरदरीकर्ता शासनाकडून नंबर,पण नंबर नॉट रिचेबल, लोकशाहीकडून उघड Lokshahi Reality Check : कफ सिरपवर बंदी, खबरदरीकर्ता शासनाकडून नंबर,पण नंबर नॉट रिचेबल, लोकशाहीकडून उघड
ताज्या बातम्या

Lokshahi Reality Check : कफ सिरपवर बंदी, खबरदरीकर्ता शासनाकडून नंबर,पण नंबर नॉट रिचेबल, लोकशाहीकडून उघड

कफ सिरप बंदी: लहान मुलांसाठी जीवघेणं ठरलेलं सिरप, प्रशासनाची खबरदारी अपुरी.

Published by : Riddhi Vanne

Lokshahi Reality Check : कफ सिरप ठरतंय लहान मुलांसाठी जीवघेणं, कोणाला माहित होते की एका कफ सिरफमुळे लहान मुलांचा मृत्यू होऊ शकतो. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तमिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यामुळे 14 लहान मुलांचा मृत्यू झाला, तर काही मुलं गंभीर आजारी पडली आहेत. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.

या घटनेनंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी तात्काळ ‘कोल्ड्रिफ’ सिरपच्या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली. केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून, दूषित औषधांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. केरळ आणि तामिळनाडू सरकारांनी या सिरपचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत पाठवून त्यावरील तपास वेगाने करण्यात यावा असे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ‘कोल्ड्रिफ’ सिरपचा वापर त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. नागपुरात औषध विक्रेत्यांची तपासणी सुरू असून संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, एफडीएने टोल फ्री क्रमांक जारी करत नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही मेडिकलमध्ये हे सिरप आढळल्यास त्वरित माहिती द्यावी. आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना हे कफ सिरप मुलांना न देण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. टोल फ्री क्रमांक नंबर 1800 222 365

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....