थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयातून अधिकारांशिवाय देण्यात आलेल्या ४९०० जन्म प्रमाणपत्रांपैकी तब्बल २८०० प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.
ही प्रमाणपत्रे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय दिल्याने ती बेकायदा ठरली आहेत.
जिल्हा प्रशासनाने सर्व प्रमाणपत्रे परत घेण्यासाठी विशेष समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.
(Chhatrapati Sambhajinagar Valley Hospital) छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयातून अधिकारांशिवाय देण्यात आलेल्या ४९०० जन्म प्रमाणपत्रांपैकी तब्बल २८०० प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. ही प्रमाणपत्रे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय दिल्याने ती बेकायदा ठरली आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व प्रमाणपत्रे परत घेण्यासाठी विशेष समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीस महसूल, आरोग्य व मनपा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत १५० जणांवर एफआयआर दाखल झाले असून, आणखी ३० ते ४० जणांवर कारवाई होणार आहे. सोमय्यांनी बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील २३४ जणांविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.