Jalna Banjara Protest : बंजारा समाजाचं एसटी आरक्षणासाठी उपोषण Jalna Banjara Protest : बंजारा समाजाचं एसटी आरक्षणासाठी उपोषण
ताज्या बातम्या

Jalna Banjara Protest : बंजारा समाजाचं एसटी आरक्षणासाठी उपोषण; पंकजा मुंडे उपोषणस्थळी दाखल

जालना आंदोलन: बंजारा समाजाचं एसटी आरक्षणासाठी उपोषण, पंकजा मुंडे भेटीला.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

जालन्यात आज बंजारा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन

जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू

जालन्यात उपोषणकर्ते विजय चव्हाणांची पंकजा मुंडेंनी भेट घेतली.

(Jalna Banjara Samaj Andolan) जालन्यात आज बंजारा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. सरकारकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने बंजारा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर जालना शहरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गान करावे असे आवाहन उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी केलं आहे. याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी जालन्यात उपोषणकर्ते विजय चव्हाणांची भेट घेतली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा