ताज्या बातम्या

Bank Holidays in June: जून महिन्यात इतक्या दिवस बँका राहतील बंद, यादी पाहा आणि बँकांतील कामांचे आत्ताच नियोजन करा

जूनमध्ये बँकांच्या 13 दिवसांच्या सुट्ट्या, आर्थिक नियोजनाची गरज

Published by : Team Lokshahi

जून 2025 महिना आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 13 दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरिकांनी आपले बँकिंग व्यवहार काळजीपूर्वक नियोजित करणे अत्यावश्यक ठरेल. विविध सण, उत्सव, शनिवार-रविवारच्या सुट्ट्या, तसेच काही राज्यस्तरीय सुट्ट्यांमुळे हा प्रभाव दिसून येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दर महिन्याला सुट्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. यामागचा हेतू म्हणजे नागरिकांनी वेळेवर आपली आर्थिक कामे पार पाडावी व बँक बंद असल्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.

कोणत्या दिवशी बँका बंद राहणार?

१ जून - रविवार - देशभर

६ जून - ईद-उल-अधा / बकरी ईद

७ जून - ईद-उल-अधा / बकरी ईद

८ जून - रविवार - देशभर

११ जून संत कबीर जयंती - गंगटोक, सिमला

१४ जून - दुसरा शनिवार - देशभर

१५ जून - रविवार - देशभर

२१ जून - वटपौर्णिमा - महाराष्ट्र व काही राज्यांत

२२ जून - रविवार - देशभर

२६ जून - जम्मू-काश्मीर स्थापना दिन - जम्मू-काश्मीर

२८ जून - चौथा शनिवार - देशभर

२९ जून - रविवार - देशभर

३० जून - रेमना नी - मिझोराम

डिजिटल व्यवहारांना अडथळा नाही

सुट्ट्यांमुळे बँकांच्या शाखा बंद असतील, मात्र ऑनलाइन बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहार, यूपीआय व मोबाईल बँकिंग सेवा या काळातही पूर्णपणे कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर करणे ही आता काळाची गरज ठरते. आज आपण आर्थिकदृष्ट्या डिजिटल युगात प्रवेश केला असला, तरीही अनेक व्यवहारांसाठी अजूनही शाखा बँकिंगवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अशा दीर्घ सुट्ट्यांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पूर्वनियोजन हीच योग्य भूमिका ठरते.

महत्त्वाचे व्यवहार उशीर न करता पूर्ण करा.

रोख रक्कम, चेक क्लिअरन्स किंवा पासबुक एंट्रीसारख्या बाबी सुट्टीच्या आधी उरकाव्यात. डिजिटल पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करावा – UPI, नेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप्स हे आजच्या काळात अत्यंत उपयुक्त साधनं आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी