ताज्या बातम्या

ग्राहकांनो! आर्थिक व्यवहाराचे नियोजन करा; मे महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्टी

मे 2025 महिना बँकिंग ग्राहकांसाठी विशेष लक्ष देण्याचा आहे. कारण यावर्षी मे महिन्यात एकूण 12 दिवस काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.

Published by : Rashmi Mane

मे 2025 महिना बँकिंग ग्राहकांसाठी विशेष लक्ष देण्याचा आहे. कारण यावर्षी मे महिन्यात एकूण 12 दिवस काही राज्यात बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध सण, राष्ट्रीय व प्रादेशिक दिन, तसेच मान्यवरांच्या जयंतीचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत बँकिंग व्यवहार उरकण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

एकाच महिन्यात 12 सुट्ट्या,नागरिकांसाठी आव्हान

या महिन्यातील 12 सुट्ट्यांमध्ये रविवार, शनिवार आणि विविध राज्यांमध्ये लागू होणाऱ्या सण आणि जयंती यांचा समावेश आहे. या सर्व सुट्ट्या देशभर लागू असणार नाहीत, त्यामुळे ग्राहकांनी आपापल्या राज्यातील सुट्टीच्या तारखा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून तपासून घ्याव्यात.

मे महिन्यातील सुट्ट्यांची सविस्तर यादी -

1 मे ( गुरुवार ) – महाराष्ट्र दिन/कामगार दिन

4 मे (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

9 मे (शुक्रवार) – रवींद्रनाथ टागोर जयंती (मुख्यतः प. बंगालात) / महाराणा प्रताप जयंती (तारखेप्रमाणे)

10 मे (शनिवार) – दुसरा शनिवार

11 मे (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

12 मे (सोमवार) – बुद्ध पौर्णिमा

16 मे (शुक्रवार) – राज्य दिन (निवडक राज्यांमध्ये)

18 मे (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

24 मे (शनिवार) – चौथा शनिवार

25 मे (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

26 मे (सोमवार) – काजी नजरुल इस्लाम जयंती

29 मे (गुरुवार) – महाराणा प्रताप जयंती - तिथीप्रमाणे (राजस्थान)

ग्राहकांसाठी विशेष सूचना

बँका बंद असल्या तरी नेट बँकिंग, UPI, एटीएम, मोबाइल बँकिंग सेवा सुरू राहतील.

चेक क्लिअरिंग, डीडी इश्यू, रोकड व्यवहार, डिमांड ड्राफ्ट आणि पासबुक अपडेटसारख्या सेवा या सुट्ट्यांमध्ये बाधित होणार.

व्यावसायिक आणि लघुउद्योजकांनी मोठे आर्थिक व्यवहार या तारखांमध्ये टाळावेत.

वेतन प्रक्रिया, महिना अखेरचे व्यवहार आणि खात्रीशीर व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करावेत.

अर्थतज्ज्ञांचा इशारा

अर्थतज्ज्ञांनी या कालावधीत वित्तीय अडचणी टाळण्यासाठी व्यवहाराचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. बँक बंद असल्याने व्यवहार रखडू शकतात व त्याचा प्रत्यक्ष प्रभाव व्यवसाय, उद्योग आणि सामान्य ग्राहकांवर होऊ शकतो.

मे महिन्यातील बँक सुट्ट्यांची ही यादी सामान्य ग्राहकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वेळेत पार पाडा, सुट्टीच्या काळात गोंधळ टाळा, या सुट्ट्या काही राज्यात लागू होतात तर काही राज्यात लागू होत नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा