Bank Holidays  
ताज्या बातम्या

Bank Holidays : महत्त्वाचे काम असेल तर आताच उरकून घ्या; ऑक्टोबरमध्ये 'इतके' दिवस बँका राहणार बंद

बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आधीच नियोजन करून ठेवणे आवश्यक

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • ऑक्टोबरमध्ये बँका राहणार बंद

  • महत्त्वाचे काम असेल तर आताच उरकून घ्या

  • बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आधीच नियोजन करून ठेवणे आवश्यक

(Bank Holidays) ऑक्टोबर 2025 हा महिना सण-उत्सवांनी भरलेला आहे. गांधी जयंतीपासून, दिवाळी, छठ पूजा आणि भाऊबीजपर्यंत अनेक प्रसंगी बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आधीच नियोजन करून ठेवणे आवश्यक आहे. बँका बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहार, रोख रक्कम काढणे किंवा जमा करणे, चेक क्लीयरिंग यांसारखी कामे प्रभावित होऊ शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यात एकूण 18 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये सर्व रविवारी व दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. त्याशिवाय विविध राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या लागू होणार आहेत.

सुरुवात 1 ऑक्टोबरला होईल, जेव्हा अनेक राज्यांमध्ये महानवमी, दसरा आणि दुर्गा पूजेमुळे बँका बंद राहतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरातील बँका बंद राहतील. दिवाळीच्या काळात 20 ते 23 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, सिक्कीम, मणिपूरसह विविध राज्यांमध्ये सुट्ट्या लागू होणार आहेत.

याशिवाय 6 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, 7 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती, 10 ऑक्टोबरला करवा चौथ, 27 आणि 28 ऑक्टोबरला छठ पूजेच्या निमित्ताने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त गुजरातमध्येही बँकांना सुट्टी असेल.

या सुट्ट्यांमुळे जर ग्राहकांना महत्वाची कामे करायची असतील, तर त्यांनी आधीच नियोजन करून ठेवणे गरजेचं आहे. विशेषत: चेक डिपॉझिट, मोठ्या व्यवहारांची मंजुरी किंवा कर्जाची हप्ते भरायचे असल्यास तारखांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

डिजिटल बँकिंगमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळतो. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, UPI आणि ATM सेवांचा वापर करून व्यवहार सुरळीतपणे करता येतात. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्या असल्या तरी बहुतांश कामे ग्राहक ऑनलाइन पूर्ण करू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा