ताज्या बातम्या

Banking rules : आता बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

येत्या १ नोव्हेंबरपासून बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये कमाल चार नॉमिनी ठेवता येणार आहेत. या नियमामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीत दाव्यांच्या निकाली प्रक्रियेत एकसमानता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होईल

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • आता बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार

  • १५ एप्रिल २०२५ रोजी हा अधिनियम अधिसूचित

  • १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

येत्या १ नोव्हेंबरपासून बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये कमाल चार नॉमिनी ठेवता येणार आहेत. या नियमामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीत दाव्यांच्या निकाली प्रक्रियेत एकसमानता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होईल, असे केंद्रीय अर्थ खात्याने सांगितले.

बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम, १ नोव्हेंबर २०२५ पासून २०२५ अंतर्गत नॉमिनीशी संबंधित प्रमुख तरतुदी लागू होतील. १५ एप्रिल २०२५ रोजी हा अधिनियम अधिसूचित केला होता.

यात एकूण पाच कायद्यांमधील १९ दुरुस्त्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ बँकिंग नियमन कायदा, १९४९, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, १९५५; आणि बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व हस्तांतरण) कायदा, १९७० व १९८० या कायद्यातील दुरुस्त्यांनुसार, ग्राहक एकाचवेळी किंवा क्रमवार पद्धतीने चार व्यक्तींचे नामनिर्देशन करू शकतील. ज्यामुळे ठेवीदार आणि नामनिर्देशित दोघांसाठी दावे निकाली काढणे अधिक सोपे होईल. ठेवीदारांना आपल्या पसंतीनुसार एकाचवेळी किंवा क्रमवार नामनिर्देशन करण्याची मुभा असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा