ताज्या बातम्या

Diwali 2025 Bank Holiday : बॅंकांना दिवाळीच्या चार दिवस सुट्ट्या, तुमच्या शहरात कधी बंद?

दिवाळी 2025 च्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँक सुट्ट्यांबाबत (Diwali 2025 Bank Holiday) गोंधळ निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये सोमवार, 20 ऑक्टोबर दिवाळी साजरी केली जात आहे,

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • 20 ऑक्टोबर रोजी सुट्टी असलेली राज्ये

  • 21 ऑक्टोबर रोजी सुट्टी असलेली राज्ये

  • चार दिवसांच्या सुट्टींचे शेड्यूल

दिवाळी 2025 च्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँक सुट्ट्यांबाबत (Diwali 2025 Bank Holiday) गोंधळ निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये सोमवार, 20 ऑक्टोबर दिवाळी साजरी केली जात आहे, तर काहींमध्ये मंगळवार, 21 ऑक्टोबर दिवाळीचा दिवस आहे. या बदलामुळे बँकिंग सेवा राज्यानुसार वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील. फेस्टिव्हल सीझनमध्ये बँकिंगचे महत्वाचे काम असेल तर नागरिकांनी आपल्या शहरातील सुट्टीची माहिती आधी तपासणे गरजेचे आहे, अन्यथा कामात अडथळा येऊ शकतो.

20 ऑक्टोबर रोजी सुट्टी असलेली राज्ये

राज्यांमध्ये बँकिंग सेवा (Diwali 2025) सोमवारी दिवाळी साजरी करणाऱ्या पूर्णपणे बंद राहतील. त्रिपुरा, गुजरात, मिजोरम, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंडीगढ़, तमिळनाडू, उत्तराखंड, असम, (Bank Holiday Date) तेलंगाना, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या Diwali 2025 राज्यांचा समावेश आहे:

21 ऑक्टोबर रोजी सुट्टी असलेली राज्ये

मंगळवारी दिवाळी साजरी करणाऱ्या राज्यांमध्ये बँक बंद राहतील. यामध्ये प्रमुख राज्ये : महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश

चार दिवसांच्या सुट्टींचे शेड्यूल

दिवाळीनंतर देखील बँक सुट्ट्या संपत नाहीत. फेस्टिव्हल सीझनमध्ये चार दिवस सलग सुट्टी असणार आहे:

22 ऑक्टोबर (बुधवार) – विक्रम संवत नववर्ष, बली प्रतिपदा, दीपावली, गोवर्धन पूजा:

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्किम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे बँक बंद राहतील.

23 ऑक्टोबर (गुरुवार) – भाई दूज, चित्रगुप्त जयंती, निंगल चाकौबा:

गुजरात, सिक्किम, मणिपुर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश मध्ये बँकिंग ठप्प राहणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा