ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : महापौरपदाच्या शर्यतीत ‘बॅनरबाजी’चा रंग!पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट चर्चेत

महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा व्हायची बाकी असतानाच शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीपूर्वीच काही कार्यकर्त्यांनी ‘भावी महापौर’ म्हणून बॅनर झळकवून आपल्या नेत्यांना खूष करण्याची स्पर्धाच सुरू केली आहे.

Published by : Prachi Nate

महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा व्हायची बाकी असतानाच शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीपूर्वीच काही कार्यकर्त्यांनी ‘भावी महापौर’ म्हणून बॅनर झळकवून आपल्या नेत्यांना खूष करण्याची स्पर्धाच सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या नावाचे ‘भावी महापौर’ असे लिहिलेले बॅनर शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजून आरक्षण जाहीर झालेले नसताना आणि निवडणुकीचा कार्यक्रमही निश्चित न झालेला असताना, अशा प्रकारची बॅनरबाजी अनेक इच्छुकांच्या कपाळावर आठ्या आणणारी ठरली आहे. अनेकांनी या प्रकाराला “अतिउत्साही समर्थकांची आगाऊ खेळी” असे संबोधले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत सात माजी महापौरांनी प्रवेश केला आहे, विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, गजानन बारवाल, अनिता घोडेले, कला ओझा आणि राजेंद्र जंजाळ यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या अनुभवी नेत्यांना पक्षात घेताना त्यांना नेमकी कोणती हमी देण्यात आली, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, “महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच बॅनरबाजी सुरू झाली म्हणजे, स्थानिक राजकारणातील गटबाजी अधिक तीव्र होणार हे निश्चित आहे.” छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, सिद्धांत शिरसाट यांच्या नावावरून उठलेली चर्चा ही आगामी राजकीय समीकरणांची झलक दाखवते, एवढे मात्र निश्चित!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा