ताज्या बातम्या

मुंब्रा सम्राट जितूउद्दीन खान, मॉडर्न अफजल खानाचे करायचे काय? जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भांडूपमध्ये बॅनर्स

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे. बावनकुळे यांनी औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत असे लिहिले आहे की, ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ अशा शब्दात त्यांनी खोचक ट्विट केलं होते.

याच सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंजेबाने विष्णूचं मंदिर पाडलं नव्हतं असं म्हटलं होतं. त्यावरून औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा नव्हता असं आव्हाड यांना म्हणायचं आहे काय? असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी आव्हांडावर हल्लाबोल केला आहे. आज भांडूपमध्ये रस्त्यांवर आव्हाडांविरोधातील बॅनर्स झळकले. त्यात आव्हाडांचा उल्लेख मुंब्रा सम्राट जितूउद्दीन खान असा उल्लेख करण्यात आले आहे. हे बॅनर्स सध्या चर्चचा विषय ठरत आहे.

या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना दाखवण्यात आले आहेत. बाजूलाच जितेंद्र आव्हाड यांनाही दाखवण्यात आलं आहे. मात्र, आव्हाड यांना अफजल खानाच्या पोशाखात दाखवण्यात आलं आहे. असे दाखवत बॅनरवर लिहिले आहे की, मुंब्रा रक्षक जितूउद्दीन खान. महाराज… औरंगजेबाचे उद्दातीकरण करणाऱ्या मॉडर्न अफजल खानाचे (जितूउद्दीनचे) करायचे काय? तुम्हीच सांगा महाराज, असे लिहिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन