ताज्या बातम्या

Health Tips : 'या' पदार्थांसोबत सब्जा करा मिक्स; मिळतील उत्तम रिजल्ट

आपल्या शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जा दाणे हा उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो.

Published by : Rashmi Mane

उन्हाळ्यात शरिराला शीतलता देण्यासाठी थंड पाण्याचे, बर्फाचे, फळांच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. परंतू याने तात्पुरत्या स्वरुपात थंडावा मिळतो. मात्र आपल्या शरिरातील मूळ उष्णता तशीच राहते. आपल्या शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जा दाणे हा उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो. मात्र हा सब्जा कोणकोणत्या पदार्थासोबत घेता येईल, माहिती आहे का. ते जाणून घेऊया.

हे पेय बनवू शकता -

रोज मिल्क - अतिशय जुने आणि मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते पेय म्हणजे रोज मिल्क. दूध, रोज सिरप आणि सब्जा दाणे त्यांचे मिश्रण करून तयार केलेले हे पेय बनवण्यास सोपे आणि टेस्टी लागले.

सब्जा विथ लिंबू - रोज सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे आपण अनेदका वाचले असेल. मात्र सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबू, मध आणि रात्री भिजत ठेवलेले एक चमचा सब्जा दाणे टाकून ते पाणी प्यायल्यास दिवसभर शरीर थंड राहते.

सब्जा आणि दालचिनी पावडर - उन्हाळ्यात घाम येऊन शरिरातील पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. शरीर डिहायड्रेट होते. अशातच दररोज एक ग्लास सब्जा पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर मिसळल्यास आपली अतिरिक्त चरबी वितळण्यासही मदत होते. याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस