Nashik Crime  
ताज्या बातम्या

Nashik Crime : बासsss आता नाही सहन होतं! ... तब्बल 7 पानांची चिठ्ठी लिहीत नवविवाहीत महिलेने जीवन संपवलं

आधी पुण्याची वैष्णवी हगवणे, नंतर मुंबईतील गौरी गर्जे आणि आता नाशिकमध्येही एका नववधूने सासरच्या छळाला कंटाळून तिचं अनमोल आयुष्य संपवून टाकलं.

Published by : Varsha Bhasmare

तब्बल 7 पानांची चिठ्ठी लिहीत एका नवविवाहीत महिलेने टोकाचं पाऊल उचलंत जीवन संपवलं.आधी पुण्याची वैष्णवी हगवणे, नंतर मुंबईतील गौरी गर्जे आणि आता नाशिकमध्येही एका नववधूने सासरच्या छळाला कंटाळून तिचं अनमोल आयुष्य संपवून टाकलं. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून बुधवारी राहत्या घरी विष प्राशन करत तिने आत्महत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून गेल्या काही महिन्यांत महिलांविरोधातील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. त्यापायी कित्येक महिलांना जीव गमवावा लागला असून आता नाशिकमधील या घटनेने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहीलेली 7 पानांची चिठ्ठी वाचून तिच्यावर होणारा अन्याय, तिला होणारा त्रास पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील. हा बापू डावरे ऊर्फ नेहा संतोष पवार (२४, रा. हिरावाडी), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मृत महिलेचा विवाह अवघ्या 5 महिन्यांपूर्वीच झाला होता. हळद लावून ती माहेरहीन लग्न करून सासरी आली, गृहप्रवेश झाला आणि तिथेच तिच्या छळाला सुरूवात झाली. पाच महिन्यांपूर्व जून महिन्यात संतोष पवार नामक युवकासोबत तिचं लग्न झालं. मात्र या विवाहानंतर तिचा पती, सासू, तसेच नणंदेकडून विविध कारणांनी शारीरिक-मानसिक छळ करण्यात आल्याचं तिने तिच्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. ती माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला.

एवढंच नव्हे तर कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार पती व नणंदेकडून करण्यात आल्याचा आरोपही मृत महिलेने तिच्या चिठ्ठीत केला आहे. माहेरुन पैसे आण अशी मागणी सासरचे करत होते. लग्नाआधी नवऱ्याचेएका तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्याचे अश्लील फोटो दाखवून मानसिक त्रास देऊ लागला असा आरोपही तिने केला आहे. पती, सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेतला जायचा, त्याच मानसिक त्रासाला कंटाळून नेहा पवार हिने लग्नानंतर 5-6 महिन्यांतच जीवनाला कंटाळून आयुष्य संपवलं.

अखेर हा त्रास सहन न झाल्याने बुधवारी तिने टोकाचं पाऊल उचललं. आधी 7 पानांची चिठ्ठी लिहीत त्यात सगळी आपबिती कथन केली आणि त्यानंतर तिने घरातच विषप्राशन करून तिचं आयुष्य संपवलं. ही चिठ्ठी सासरच्यांच्या हाती लागली तर पुरावे नष्ट करतील म्हणून विवाहितेनं चिठ्ठी लिहून त्याचे फोटो भावाला पाठवल्याचंही उघड झालं आहे. या विवाहित महिलेच्या च्या सुसाइड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा