संजय देसाई, सांगली
जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळयातील नागपंचमी ही जिवंत नागाची पूजेसाठी प्रसिद्ध होती पण न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश दिल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रतीकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते.
शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. शिराळा मध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते. यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारला त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने सांगितले नागाची पूजा करत होते.
त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळी पासून ही परंपरा 32 शिराळा मध्ये सुरू झाली. ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात. त्यामुळे आता घरोघरी नागपंचमी दिवशी नागाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येते. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा नगरीत पोलीस दलासह वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहे.