इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा आज, शनिवारी करण्यात आली. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी ही घोषणा केली. रोहित शर्माच्या कसोटी सामन्यांसाठीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा नवनिर्वाचित कर्णधार शुभमन गिल तसेच उपकर्णधार रिषभ पंत यांच्या नावाची घोषणाही यावेळी करण्यात आली. तसेच इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातील खेळाडूंची नावेही जाहीर केली गेली. यावेळी अजित आगरकर म्हणाले की, "संघात शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईस्वरन, करुण नायर, नितिश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांचा समावेश असणार आहे.
भारतीय संघ २० जून ते ऑगस्टदरम्यान इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून यावेळी ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.