ताज्या बातम्या

तुम्ही खाजगी लोन अ‍ॅपवरुन लोन घेतलं आहे का तर सावधान; तरुणीसोबत घडलं असं की...

Published by : Siddhi Naringrekar

लोन ॲपवरून बदनामी करण्याचे प्रकार थांबतच नाही आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोन अॅपवरुन फसवणुक केल्याचे प्रकार समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाडच्या कुरारमध्ये हा प्रकार घडला आहे. मालाडमधील एका ग्राफिक्स डिझायनर ने पैशाची गरज असल्याने त्याने एक लोन ॲप डाउनलोड केले. त्याने या ॲपवरून १८ हजार रुपये कर्ज घेतले आणि मुदतीमध्ये हे कर्ज फेड केले. कोणत्याही कटकटीविना कर्ज मिळत असल्याने या तरुणाचा ॲपवर विश्वास बसला. त्याने पुन्हा एकदा याच ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतले आणि ते देखील फेडले. मात्र तरीही ॲपच्या वतीने तरुणाला कर्ज फेडण्यासाठी फोन येऊ लागले. शिव्यांचे संदेश येऊ लागले. इतके होऊनही या तरुणाने आणखी पैसे भरण्यास नकार देताच त्याची बदनामी सुरू करण्यात आली.

त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. त्याने पैसे देण्यास नकार दिला म्हणून या तरुणाचे आणि तो नोकरी करीत असलेल्या मालकाच्या मुलीचे फोटो मॉर्फिंग करून व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे फोटो त्याच्या मालकाला तसेच संपर्कातील इतरही अनेकांना पाठविण्यात आले. अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचे त्याच्या मित्रांनी आणि मालकाने सांगितल्यानंतर या तरुणाने कुरार पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका