ताज्या बातम्या

Beauty Tips : ओठ कोरडे पडण्याची 'ही' 6 कारणे

ओठांच्या कोरडेपणाची कारणं आणि सोपे उपाय

Published by : Team Lokshahi

आपले ओठ सौंदर्याचं आणि आत्मविश्वासाचं एक प्रतीक असते. पण ओठांची त्वचा खूप नाजूक असते आणि त्यामध्ये तेल ग्रंथी (ऑइल ग्लँड्स) नसल्याने ती लवकर कोरडी पडते. यामुळे अनेकजण सतत लिप बाम वापरूनही आराम मिळत नाही अशी तक्रार करतात. पण यामागे काही खास कारणं असू शकतात. चला तर जाणून घेऊया ओठ कोरडे पडण्याची प्रमुख कारणं आणि त्यावर उपाय आहे.

1. फ्रेग्नन्स आणि मेन्थॉलयुक्त लिप बाम

काही लिप बाम चांगल्या ब्रँडचे असले तरी त्यातील कृत्रिम वास किंवा मेन्थॉल ओठांची त्वचा अजून अधिक कोरडी करू शकतात. जर तुम्ही नियमित लिप बाम वापरता आणि तरीही तुमचे ओठ बरे होत नसतील, तर त्यामागे हेच कारण असण्याची शक्यता आहे.

2. एसपीएफ नसलेली लिप केअर प्रॉडक्ट्स

उन्हामध्ये चालताना तुमच्या ओठांचं संरक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. SPF नसलेले लिप बाम किंवा लिपस्टिकमुळे सूर्यकिरणांचा परिणाम होऊन ओठ कोरडे, काळे आणि रुखरुखीत होतात. किमान SPF 15 असलेले लिप प्रॉडक्ट निवडणे आवश्यक आहे.

3. डिहायड्रेशन – शरीरात पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास त्याचा परिणाम सर्वप्रथम ओठांवर दिसतो. ओठांना नैसर्गिक तेल नसल्याने ते पटकन कोरडे पडतात. त्यामुळे दररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

4. ग्लिटरी लिपस्टिकचा वापर

ग्लिटरयुक्त लिपस्टिक आकर्षक दिसत असली तरी ती ओठांच्या नाजूक त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. जर तुम्हाला अशा लिपस्टिकचा वापर करायचा असेल तर आधी एक थर लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावणे फायदेशीर ठरेल.

5. एक्सफोलिएशनचा अभाव

डेड स्किन जमा झाल्याने लिप बाम ओठांमध्ये नीट शोषित होत नाही. आठवड्यातून एकदा सौम्य साखरेचा स्क्रब, मृदू टूथब्रश किंवा हलका एक्सफोलिएंट वापरून ओठ स्वच्छ केल्यास त्यांची मऊतास आणि ओलसरता टिकून राहते.

6. मॅट लिपस्टिकचा अतिवापर

मॅट लिपस्टिकमध्ये ग्लॉसी लिपस्टिकच्या तुलनेत अधिक व्हॅक्स असते, त्यामुळे ती त्वचेला ड्राय करते. विशेषतः हिवाळ्यात याचा परिणाम जास्त होतो. म्हणून मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम वापरणे अत्यावश्यक आहे.

सौंदर्य ही नैसर्गिक झळाळीची ओळख असते. त्यामुळे ओठांचा सांभाळ करणं हे देखील एक महत्त्वाचं सौंदर्य मंत्र आहे. योग्य उत्पादने, भरपूर पाणी आणि थोडी काळजी यामुळे तुमचे ओठ राहतील मऊ, कोमल आणि आकर्षक.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप