Beed Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

बीड : आष्टीमध्ये कार दरीत कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू

Accident in Ashti Ghat : प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील तिघांचा समावेश.

Published by : Sudhir Kakde

बीड| विकास माने : बीडच्या धामणमध्ये एक भीषण अपघात (Beed Accident) घडल्याची माहिती समोर आली आहे. कार दरीत कोसळल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात तब्बल 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील धामणगाव (Dhamangan, Ashti) येथील घाटात झालेल्या या अपघातात बीड येथील टेकवाणी कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तसंच अन्य एकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांचा मृतांत समावेश आहे. तर आणखी एका मृताची ओळख पटलेली नाही.

बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा