बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 17 वर्षीय मुलीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. नीटची परीक्षा देणाऱ्या मुलीचा दोन शिक्षकांनी लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता.
मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे.