बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे वय 34 एका नर्तिकेशी असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूरातील जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुर गावात एका कारमधून त्यांचा आढळून आला. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे.
मृत गोंविद बर्ग यांचा थापडीतांडा येथील एका कला केंद्रात काम करणाऱ्या पुजा गायकवाड नावाच्या नर्तिकेशी सुमारे दीड वर्षापूर्वी परिचय झाला होता. त्या ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी वांरवांर पारगाव येथील कला केंद्रावर जात होता. त्यांचं इतक प्रेम होतं की, तो तिच्यावर जास्त प्रमाणात खर्च केला. त्यात महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने यांचा समावेश होता.
परंतू गेल्या काही काळानी त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. पुजा गायकवाडने गोंविद बर्गेने बीडमधील स्वताचा बंगला तिच्या नावावर करण्याची त्याचबरोबर भावाच्या नावावर असलेली पाच एकर शेती लिहून देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला नाकार दिल्याने पूजाने बलात्काराचा आरोप करण्याची धमकी दिली. त्यामुळे बर्गे हे मानसिक तणावाचा प्रचंड तणावात आला होता. अनेकदा प्रयत्न करूनही पूजाशी संपर्क न झाल्याने आणि तिने संवाद बंद केल्याने ते अधिकच व्यथित झाले होते. शेवटी सोमवारी रात्री ते पूजाच्या सासुर येथील घरी गेले. तिथे नेमकं काय घडलं, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्याच रात्रीच्या किंवा पहाटेच्या सुमारास पूजा गायकवाडच्या घराजवळील कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कारमध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती. कार बंद अवस्थेत होती आणि मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर सापडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, सर्व तपास सुरु करण्यात आला आहे. ही आत्महत्या असली तरी कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. बर्गे हे मूळचे लुखामसला गावचे असून, तेथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.