ताज्या बातम्या

‘तुमची मुलगी मला द्या’ गावगुंडाची शिक्षकाला धमकी,भरधाव ट्रॅक्टर थेट चारचाकीवर चढवला अन्...

बीडमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बीडमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुमची मुलगी मला द्या’ असे म्हणत एका शिक्षकाला गाडीसह ट्रॅक्टरखाली चिरडल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यात ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून गवंडीकाम करणाऱ्या एका गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरखाली चिरडले आहे.

बाजीराव डोईफोडे असे त्यांचे नाव असून तालुक्यातील वरपगाव येथे शिक्षक आहेत. वरपगावकडे जात असताना सूरजने त्यांची गाडी अडवून ‘तुमची मुलगी मला द्या, माझे लग्न तुमच्या मुलीशी लावून द्या’ अशी मागणी केली. त्यांनी त्याला अडवल्यानंतर सूरजने त्यांच्या चारचाकीवर ट्रॅक्टर घातला आणि त्यांच्यावर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

शिक्षकाला बीड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाजीराव डोईफोडे यांच्या मुलीला गुंड सूरज दिलीप बऱ्याच दिवसांपासून त्रास देत होता. त्या मुलीला तो धमकी देत होता. धमकीही तो दिला देत होता. त्याच्याविरोधात डोईफोडे कुटुंबाने शिवाजीनगर आणि केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टिका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने