बीडमधील सतीश भोसलेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बीडमध्ये सतीश भोसले याने एका व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यानंतर सतीश भोसले याचा कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातच आता पुन्हा एकदा सतीश भोसले याचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा शाळेतील मुलांसमोर धमकी देताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये सतीश भोसले म्हणत आहे की, 'ज्यावेळी सर काही करणार नाहीत, त्यावेळेस मी माझ्या हाताने करेन. डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून मी जेलमध्ये जायला तयार आहे. पहिलेच माझ्यावर एवढे केसेस आहेत. एखादी केस अजून झाली तर मला फरक पडत नाही. एवढीच वॉर्निंग आहे तुम्हाला' असे तो या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.