बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घुण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र या कठीण परिस्थितीमध्येही संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने बारावीची परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तिला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले. वैभवीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.