थोडक्यात
जरांगेंसाठी बीडमधील शिरूर कासार तालुक्यात बंदची हाक
जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
हत्येचा कट रचणाऱ्या आणि सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येची सुपारी दिल्याच्या बातमीनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. त्या पार्श्ववभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आणि सुपारी देणाऱ्यांना अटक करा-आज शिरूर कासार तालुका कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आणि सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा धक्कादायक कट उघडकीस आल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात बीड येथील दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून या दोघांची कसून चौकशी सुरु केली आहे. यासोबतच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची देखील चौकशी पोलिसांनी सुरु केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दादा गरूडला हा पोलिसांच्या ताब्यात आहे. अशातच त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत आहे.