Benefits of Using Aloe Vera Benefits of Using Aloe Vera
ताज्या बातम्या

Benefits of Using Aloe Vera : कोरफडीने केस खरंच वाढतात का? जाणून घ्या सत्य आणि योग्य वापरण्याची पद्धत

दाट, लांब आणि चमकदार केसांची इच्छा सर्वांनाच असते. या इच्छेपोटी अनेकजण महागडी केसांची उत्पादने, कंडीशनर, सिरम आणि सप्लिमेंट्सवर भरपूर खर्च करतात. त्यातच सोशल मीडियावर रोज नवे घरगुती उपाय व्हायरल होत असतात.

Published by : Riddhi Vanne

दाट, लांब आणि चमकदार केसांची इच्छा सर्वांनाच असते. या इच्छेपोटी अनेकजण महागडी केसांची उत्पादने, कंडीशनर, सिरम आणि सप्लिमेंट्सवर भरपूर खर्च करतात. त्यातच सोशल मीडियावर रोज नवे घरगुती उपाय व्हायरल होत असतात. त्यातील एक म्हणजे डोक्यावर ताजी कोरफड चोळल्याने केस गळती थांबते आणि टक्कल भरते, असा दावा, पण हा उपाय खरंच उपयोगी आहे का? चला सविस्तर पाहूया.

कोरफडमध्ये नक्की काय असतं?

कोरफडीच्या पानांच्या आतील भागात हलका, चिकट आणि थंड गुणधर्म असलेला जेल असतो. या जेलमध्ये

  • व्हिटॅमिन A, C, E, B12

  • झिंक, मॅग्नेशियम

  • अँटिऑक्सिडंट्स

  • फॅटी अॅसिड्स

कोरफड लावल्याने केस पुन्हा उगवतात का?

कोरफड टाळू स्वच्छ ठेवण्यास, खाज कमी करण्यास आणि कोंड्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. केसांची मुळेही ती मजबूत करते. परंतु टक्कलावर नवे केस उगवतील असा वैज्ञानिक पुरावा आत्तापर्यंत नाही होय, कोरफड आरोग्यदायी वातावरण तयार करते ज्यामुळे केसांची वाढ चांगली होऊ शकते, पण ती जादूई समाधान नाही.

कोरफड योग्य प्रकारे कशी वापरावी?

  • कोरफडीचे ताजे पान कापून जेल काढा.

  • हे जेल टाळूवर हलक्या हाताने मालिश करा.

  • ३०–४५ मिनिटे तसेच ठेवा.

  • तर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

  • आठवड्यात किमान २–३ वेळा असे केल्यास हळूहळू फरक दिसू शकतो.

  • कोरफड वापरताना घ्यायची काळजी

  • अॅलर्जी टेस्ट करा: कोरफड त्वचेवर सूट होत नसेल तर वापर थांबवा.

  • औषधोपचार सुरू असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या: विशेषतः मिनॉक्सिडिल सारखे उपचार सुरू असल्यास.

संतुलित आहार आणि आरोग्य महत्त्वाचे:

केसांची वाढ फक्त बाहेरून लावलेल्या वस्तूंवर नाही, तर आहार, हार्मोन्स आणि जनुकीय घटकांवरही अवलंबून असते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा