Team Lokshahi
ताज्या बातम्या

दुर्देवी! बेस्ट कर्मचाऱ्याने आगारातच केली आत्महत्या

कर्तव्यावर असतानाच कर्मचाऱ्याने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बेस्ट (BEST) उपक्रमात एक दुर्देवी घटना आज वांद्रे आगारात घडली आहे. कर्तव्यावर असतानाच एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली आहे. चंद्रशेखर देटे (Chandrasekhar Dete) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. आगाराच्या स्वच्छ्ता गृहातच चंद्रशेखर देटे यांनी आत्महत्या केली.

चंद्रशेखर देटे वांद्रे आगार येथे अभियांत्रिकी विभागात सांगाडा विभागामधील सांगाडा यांत्रिकी म्हणून कार्यरत होते. परंतु, बेस्ट उपक्रमाच्या सातत्याच्या आरोप पत्रांना कंटाळून आज अखेर त्यांनी आत्महत्या केली. वांद्रे आगारात कामावर रुजू असताना सुमारे दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास स्वच्छ्तागृहात जाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!