Best winter Haircare Tips : हिवाळा येताना आपल्या त्वचेचीच नाही, तर केसांची देखील विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. हिवाळ्यातील कोरडी हवा आणि कमी ओलावा यामुळे केस ड्राय, रूक्ष आणि निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे, हिवाळ्यात केसांची मऊ आणि निरोगी स्थिती राखण्यासाठी डीप कंडिशनिंग खूप महत्त्वाचे आहे. मार्केटमध्ये मिळणारे कंडिशनर वापरण्याच्या ऐवजी, घरच्या घरी साध्या आणि नैसर्गिक कंडिशनिंग उपायांचा वापर केल्यास आपल्याला उत्तम परिणाम मिळू शकतात.
केसांची हिवाळ्यातील समस्यांपासून बचाव कसा करावा?
हिवाळ्यात केसांची त्वचा कोरडी होऊ शकते, ज्यामुळे कोंडा आणि खाज होण्याची समस्या निर्माण होते. यासाठी आठवड्यातून दोन वेळा तेल मालिश करणे खूप फायदेशीर ठरते. नारळ तेल, तिळ तेल किंवा बदाम तेल केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी उत्तम असतात. हे केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबूत होतात.
केस धुण्याची योग्य पद्धत:
हिवाळ्यात उबदार पाण्याने केस धुणं खूप सामान्य आहे, पण गरम पाणी केसांचे नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे ते आणखी ड्राय होतात. त्याऐवजी, कोमट पाणी वापरा आणि शेवटी थोडं थंड पाणी केसांवर टाका. हे केसांच्या छिद्रांना बंद करू शकेल आणि केसांची चमक टिकवू शकेल.
हिवाळ्यातील थंड वाऱ्यामुळे केस ओले असताना बाहेर जाणं टाळा. तसेच, हेअर ड्रायरचा अति वापर केसांसाठी हानिकारक ठरू शकतो, कारण त्यातून निघणारी गरम हवा केस अधिक ड्राय करते. शक्य असल्यास, केस नैसर्गिक पद्धतीने वाळवले तरी ते चांगले.
घरगुती कंडिशनिंग उपाय:
१. केळी:
केळी हा एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जो कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी उत्तम आहे. पिकलेली केळी मॅश करून त्यात मध, अंडी आणि दूध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टला केसांवर ३० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवा. केळीमध्ये पोषक घटक असतात जे केसांना खोलवर पोषण देतात.
२. दही:
दह्यात असलेले प्रथिने आणि लॅक्टिक ऍसिड केसांना मऊ आणि गुळगुळीत बनवतात. दही, केळी, मध आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून पेस्ट तयार करा आणि ३० मिनिटे केसांवर लावा. नंतर साध्या पाण्याने धुवा. हे मिश्रण केसांना मऊपण देईल आणि स्कैल्पचा दाह कमी करेल.
३. कोरफड:
कोरफड हे केसांसाठी एक अत्यंत फायदेशीर घटक आहे. ते केसांच्या वाढीला उत्तेजन देते आणि केसांचे पीएच संतुलन साधते. एक चमचा कोरफड जळा, त्यात लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून ५ ते १० मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा वापरा, जेणेकरून आपल्याला मऊ, दाट आणि चमकदार केस मिळतील.
आहाराची देखील काळजी घ्या:
केसांच्या आरोग्याचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो. हिवाळ्यात पुरेशं पाणी प्यायला हवं, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. आहारात सुका मेवा (बदाम, अक्रोड), हिरव्या पालेभाज्या, आवळा आणि ओमेगा-३ युक्त पदार्थ समाविष्ट करा. तसेच, प्रथिनेयुक्त आहार केसांच्या मुळांना बळकट करतो, ज्यामुळे हिवाळ्यातही केसांचा नैसर्गिक सौंदर्य टिकून राहतो.