पंढपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके होते. भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे पोहचले आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेट घेणार आहेत. हैद्राबादमध्ये दाखल झाले असून केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले होते. अशी माहिती मिळत आहे.