Social media team lokshahi
ताज्या बातम्या

पोलिस व्हॅनमध्ये भाईचा बर्थ डे, पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल

Published by : Shubham Tate

गुंडाची दहशत शहरात तर असेतच मात्र पोलिस कस्टडीत असताना त्यांची भाईगिरी कुठेही कमी होत नाही. अशाच एका भाईचा बर्थ डे चक्क पोलिसांसमोरच पोलिस व्हॅनमध्ये साजरा झाल्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रोशन झा हा आरोपी उल्हासनगरात कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्या हप्त्याचा प्रयत्न खंडणी असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. कोर्टात त्याला आणले असता. त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढ दिवसाचा व्हीडीओ अनेक तरुणांनी त्यांच्या व्हाटस्अप स्टेटसवर ठेवला आहे. हा व्हीडीओ कल्याण कोर्ट परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. (Bhai's birthday in a police van, questioning the working style of the police)

पोलिसांच्या व्हॅन मध्ये असताना देखील हा गुंड केक कापत होता. मात्र, त्याला पोलिसांनी मज्जाव का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड आहे. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकवणे आणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

आज या गुंडाला कारागृहातून कल्याणच्या न्यायालयात आणण्यात आले होते, यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या गुंड रोशन झा यांने खिडकीमधून समर्थकांनी आणलेला केक कापला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. दरम्यान पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा गुंड त्याचा वाढदिवस कसा काय साजरा करू शकतो असा सवाल उपस्थित झाला आहे. आता या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जातीये.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा