ताज्या बातम्या

Bharat Gogawale : "ड्युटी संपल्यानंतर एकच्या जागी दोन तीन चपटी..."; भरत गोगावलेंचा एसटी चालकांना अजब सल्ला

माणगाव येथे एसटी कर्मचारी संघटनेचे अधिवेशन होते.

Published by : Siddhi Naringrekar

माणगाव येथे एसटी कर्मचारी संघटनेचे अधिवेशन होते. या अधिवेशनात मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. भरत गोगावले यांनी यावेळी एसटीच्या चालकांना अजब सल्ला दिला आहे. भरत गोगावले म्हणाले की, "जे काही मोबाईल फोनवरुन बोलून अपघात होतात ते टाळायला पाहिजे असं मला वाटतंय. एकवेळ तुम्ही गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा आणि मग परत गाडी न्या. तुम्हाला कोण काही बोलणार नाही."

"दुसरा मुद्दा म्हणजे जे काही कधी कधी नशापान करून गाडी चालवता आणि हजारो कामगारांना त्याला सामोरे जावे लागते. पण दोन तीन असे महाभाग असतात यांना आम्ही विनंती करतो की, तुमची ड्युटी संपल्यानंतर एकच्या जागी दोन तीन चपटी प्या पण ते घरी जाऊन प्या. पण ड्युटीवर असताना पिऊ नका." असे भरत गोगावले म्हणाले.

त्यानंतर सुनील तटकरे यावर म्हणाले की, "भरतशेठ बोलले की थोडी घ्या घरी गेल्यावर. ते पण सांगा नका घेऊ. व्यसनापेक्षा निर्व्यसनी पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर समाजाची सेवा अधिक उत्तम पद्धतीने करता येऊ शकते," असं तटकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात