Bhaskar Jadhav On BJP : कोकणातील गुहागर तालुक्यातील राजकीय वाद आता थेट समाज संघटनांच्या पातळीवर पोहोचला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर जोरदार टीका करताना “द्वेष मी पसरवत नाही, ते पसरवत आहेत” असा थेट आरोप केला आहे.
भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले की अलीकडेच कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक समस्या, एसटी व रेल्वे बुकिंग यासारख्या विषयांवर बैठक झाली होती. त्या बैठकीत ब्राह्मण सहाय्यक संघ, गुहागर यांनी दिलेल्या निषेध पत्राचा उल्लेख त्यांनी केला. “मी कुठेही ब्राह्मण समाजाबद्दल अवमानकारक भाषा वापरलेली नाही. मग माफी कसली मागायची? माझ्या सभेत चर्चा पक्षीय होती, समाजावर नव्हती,” असे जाधव म्हणाले.

त्यांनी भाजपवरही हल्लाबोल करत “भाजपने माझे राजकीय नुकसान करण्यासाठी ब्राह्मण समाजाला पुढे केले. माझ्या आई-वडिलांविषयी, विशेषतः माझ्या मृत आईबद्दल, अपमानास्पद भाषा वापरली गेली आणि काही ब्राह्मण नेते टाळ्या वाजवत होते. हा अधिकार त्यांना कोणी दिला?” असा सवाल उपस्थित केला.
जाधव म्हणाले, “ब्राह्मण सहाय्यक संघाने समाजाच्या वतीने पत्र दिले, पण भाजप किंवा संबंधित व्यक्तींच्या विरोधात का बोलले नाही? राजकीय वादाला राजकारणाने उत्तर द्यावे, समाजाला यात ओढू नये.” त्यांनी हेही नमूद केले की, “गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजाची सत्ता कायम राहिलेली आहे, मात्र सर्व ब्राह्मण माझ्या विरोधात नाहीत.”
दरम्यान, ब्राह्मण समाजातील काही नेत्यांनी जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभूत करण्याचा इशारा दिला आहे. या वादामुळे गुहागर मतदारसंघातील राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.