Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav 
ताज्या बातम्या

"शिवसेनेला सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत नेणं आपलं कर्तव्य", चिपळूणमध्ये भास्कर जाधवांचं मोठं विधान

Published by : Team Lokshahi

शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना अनेक महत्वाच्या मुद्द्दयांवर भाष्य केलं. जाधव ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून त्यांची राकजीय व्यथा मांडली होती . परंतु, आज चिपळूणमध्ये झालेल्या सभेत भास्कर जाधव आणि त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात असलेल्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. शिवसेनेला सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत नेणं आपलं कर्तव्य असल्याचं भास्कर जाधव म्हणाले, तर आम्ही कुठेही जाणार नसल्याचं विक्रांत जाधव यांनी चिपळूणच्या सभेत स्पष्ट केलं.

भास्कर जाधव पुढे म्हणाले, बऱ्याच दिवसांनंतर सर्व सहकारी एकत्र आले. शिवसेनेला सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत नेणं आपलं कर्तव्य आहे. बहुतांश खासदार चिपळूणमधूनच झाले आहेत. चिपळूणमध्ये शिवसेना उभी करणं आव्हान असेल. पाठ दाखवून पळून जाणे आमच्या रक्तात नाही. सहकाऱ्यांच्या मदतीसाठी मी पद बघत नाही.

सहकाऱ्यांच्या कायम पाठिशी उभा राहिलो. संघर्षाच्या वेळी मी स्वता मैदानात उतरतो. मी केवळ माझी निवडणूक बघत नाही. संघर्षाच्या वेळी भाड्याने माणसं आणत नाही. शिवरायांच्या नीतीप्रमाणे आपले लोक सर्वांगाने तरबेज करायला पाहिजे. २०१९ मध्ये माझ्यावर अन्याय झाला होता. पक्ष सोडणार नाही असा शब्द उद्धव ठाकरेंना दिलाय. २०१९ मध्ये मंत्री करायला पाहिजे होतं. मी लढतोय आणि लढत राहणार. पक्ष न सोडण्यासाठी कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. येणारा काळ आपलाच आहे, बाकिच्यांचा हिशोब चुकता करायचा आहे. माझ्या शिवसेनेत अनेक संधी हुकल्या, असंही ते म्हणाले.

भास्कर जाधव यांनी पत्रात काय म्हटलंय होतं?

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे...आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र...मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तीक स्वार्थ तरी काय? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळून येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास खाऊया. मी आपली वाट पाहतोय!!!

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा