ताज्या बातम्या

भीमा कोरेगावात जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Published by : Siddhi Naringrekar

भीमा कोरेगावात जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वापरणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. भीमा कोरेगावमध्ये शौर्यदिनासाठी मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात.31 डिसेंबरच्या मध्यरात्री पासून 2 जानेवारी 2023रोजी मध्यरात्रीपर्यंत 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचा विचार करता त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्यावतीने औषधे, मास्क या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असणार आहे. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले, असं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी केलं आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा