ताज्या बातम्या

Bhool Chuk Maaf : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर 'भूल चूक माफ'चे OTT वर प्रदर्शन

अभिनेता राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या बहुप्रतिक्षित 'भूल चूक माफ' या चित्रपटाचे थिएटर रिलीज रद्द करण्यात आले

Published by : Team Lokshahi

बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या बहुप्रतिक्षित 'भूल चूक माफ' या चित्रपटाचे थिएटर रिलीज रद्द करण्यात आले असून, तो आता थेट 16 मे रोजी प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, सूरज पंचोलीच्या कमबॅक चित्रपटाची 'केसरी वीर'ची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

'भूल चूक माफ' ओटीटीवर का?

'भूल चूक माफ' या कौटुंबिक चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्म्स आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांनी सोशल मीडियाद्वारे घोषणा करत सांगितले की, "सध्याच्या भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण आणि देशभरात वाढवण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे."

त्यांच्या मते, “आम्ही थिएटरमध्ये प्रेक्षकांसोबत हा सिनेमा अनुभवण्यास उत्सुक होतो, परंतु राष्ट्रहित सर्वोतोपरी आहे. म्हणून हा चित्रपट थेट तुमच्या घरी ओटीटीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

चित्रपटाच्या ओटीटीवरील प्रदर्शनावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिसळलेल्या आहेत. काहीजण हा निर्णय राष्ट्राच्या भावनांचा सन्मान करणारा मानत आहेत, तर काहीजण म्हणतात की, "हा फक्त एक बहाणा आहे .चित्रपटाला पुरेशी स्क्रीन मिळाली नाही आणि प्रचारही कमी होता."

'केसरी वीर' ची तारीख पुढे

राजपुत समुदायाच्या इतिहासावर आधारित 'केसरी वीर' या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही बदलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट 16 मे रोजी रिलीज होणार होता. मात्र आता तो 23 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातून सूरज पंचोली चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे, तर आकांक्षा शर्मा हिचा हा डेब्यू असेल. त्याचबरोबर सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्याही दमदार भूमिका यात पाहायला मिळणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा